Seller Manual (Marathi)
CityLeads.in वर रजिस्ट्रेशन चे फायदे
- मोफत रजिस्ट्रेशन
- स्वतःचा प्रोडक्ट / सर्व्हिसेसचा ऑनलाईन कॅटलॉग तयार करा.
- ग्राहक तुमचे सर्व प्रोडक्ट ऑनलाईन पाहू शकतील.
- ग्राहक तुम्हाला थेट संपर्क करू शकतील. WhatsApp चॅट, लाईव्ह चॅट, Call ऑप्शन उपलब्ध.
- कुणीही मध्यस्त नाही, कुणाला कमिशन द्यायचे नाही.
- अत्यल्प दरात जाहिरातीचा सपोर्ट.
- हि ईकॉमर्स वेबसाईट नसून, लिस्टिंग वेबसाईट आहे. त्यामुळे प्रोडक्टस अपलोड करण्यासाठी GST ची गरज नाही.
- ग्राहक त्यांच्या शहरातील हवे ते प्रोडक्ट पाहून व्यावसायिकांना थेट संपर्क करू शकतील अशा प्रकारे वेबसाईटची थीम आहे.
-
ग्राहकांना त्यांच्या शहरातील जास्तीत जास्त मार्केट खुले व्हावे व व्यावसायिकांना त्यांच्या शहरातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचता यावे हा या वेबसाईटचा उद्देश आहे.
तुमचे प्रोडक्टस किंवा सर्व्हिसेस अपलोड करण्यासाठी आधी अकाउंट रजिस्टर करावे लागेल.
नवीन अकाउंट सुरु करणाऱ्या व्यावसायिकांनी आधी या टिप्स वाचून घ्याव्यात. यातील Store Setup आणि Account Details हे दोन ऑप्शन महत्वाचे आहेत.
१. अकाउंट सुरु करण्यासाठी मेनू ऑप्शन मध्ये My Account ऑप्शन वर जाऊन Login/Sign Up या ऑप्शन वर क्लिक करावे
२. यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर Register सेक्शन मधे युजरनेम , ईमेल आणि पासवर्ड लिहून Register बटन वर क्लिक करा.
३. तुमच्या ईमेल वर जाऊन कन्फर्मेशन लिंक वर क्लिक करा. (इनबॉक्स मधे मेल दिसत नसल्यास स्पॅम किंवा प्रमोशनल सेक्शन मधे पहा)
४. ईमेल कन्फर्म केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधे लॉगिन करा व सर्व माहिती भरा.
५. स्टोअर सेटअप
अकाउंट लॉगिन केल्यानंतर स्टोअर ऑप्शन वर जाऊन तुमच्या शॉप च्या, व्यवसायाच्या सर्व डिटेल्स भरा.
Store ID तुम्हाला हवा असलेला ID लिहा
यांनतर खाली व्यवसायाचे नाव, ईमेल, संपर्क क्रमांक, पत्ता, सोशल मीडिया लिंक्स अशी सर्व माहिती भरा.
माहिती भरून झाल्यावर update store बटन वर क्लिक करा
६. स्टोअर अपडेट केल्यानंतर Account Details मध्ये जा.
अकाउंट डिटेल्स मधे सुरुवातीलाच First Name आणि Last Name ऑप्शन मधे तुमच्या व्यवसायाचे नाव लिहा. (तुम्ही इथे जे नाव लिहिणार आहात तेच नाव तुमच्या लिस्टिंग सोबत सेलर डिटेल्स मध्ये दिसणार आहे)
यांनतर इथे पुन्हा संपर्क क्रमांक, ईमेल, तुमचा पत्ता, लोकेशन लिहून Update Account बटन वर क्लिक करा. (लोकेशन मधे तुमचा व्यवसाय ज्या शहरात आहे ते शहर निवडा)
यानंतर तुम्ही तुमचे प्रोडक्ट लिस्ट करायला सुरुवात करा.
Store डिटेल्स भरल्यानंतर डॅशबोर्ड साईडबार मधेच शेवटी Add Your Products or Services ऑप्शन वर क्लिक करून तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस Add करायला सुरुवात करा
प्रोडक्ट चे फोटो चांगले ठेवा.
प्रोडक्ट ची संपूर्ण माहिती लिहा.
KeyWrods योग्य प्रकारे घ्या
२४ तासात तुमची लिस्टिंग अप्रूव्ह होईल.
लिस्टिंग अप्रूव्ह करण्याचे वा न करण्याचे संपूर्ण अधिकार CityLeads.In कडे आहेत. योग्य वाटणाऱ्या लिस्टिंगच अप्रूव्ह केल्या जातील याची नोंद घ्यावी.